सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–2025 ची मतमोजणी शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊस येथे होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 16 जानेवारी रोजी पहाटे 00.01 वाजल्यापासून ते रात्री 23.59 वाजेपर्यंत सेंट्रल वेअरहाऊसपासून 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत विविध निर्बंध लागू राहणार आहेत.
या कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचे एकत्र येणे, सभा घेणे, गटागटाने फिरणे किंवा उभे राहणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शस्त्र, काठ्या, लाठ्या बाळगणे, वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणे, स्पीकर किंवा साउंड सिस्टीम वापरणे यास मनाई करण्यात आली आहे.
यासोबतच, सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित करणे, गुलाल किंवा रंग उधळणे, आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे तसेच भडक मजकुराचे फलक, बॅनर किंवा बोर्ड लावणे यांवरही कडक बंदी घालण्यात आली आहे.
मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: Hydrogen-CNG H-BAJA 2026 मध्ये TEAM AARYANS ची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले 7 राष्ट्रीय पुरस्कार.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










