सांगली : आगामी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची महाआघाडी तयार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महाआघाडी अंतर्गत १८ प्रभागांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, केवळ दोन प्रभागांवर अद्याप तिढा कायम आहे. मिरजमधील प्रभाग क्रमांक २० आणि सांगलीतील प्रभाग क्रमांक १५ या दोन ठिकाणी उमेदवारीवरून मतभेद सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर या प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत आहेत.
महाआघाडीच्या हालचालींना गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत सलग बैठकांचे सत्र सुरू असून, रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मिरजमध्ये अतहर नायकवडी आणि अभिजीत हारगे, तर सांगलीत बिरेंद्र थोरात यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू असून, या दोन प्रभागांतील तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर महाआघाडीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, आगामी २४ तासांत सांगलीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या अंतिम भूमिकांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: District Court Sangli Calendar 2026 : सांगली जिल्हा न्यायालयाचे 2026 वर्षाचे सुट्ट्यांचे दिनदर्शक जाहीर.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










