सांगली महापालिकेत महापौर–उपमहापौर निवड बिनविरोध; १० फेब्रुवारीला औपचारिक घोषणा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका फोटो : Sangli Today

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)चे गजानन मगदूम यांच्या नावांची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

दरम्यान, काँग्रेसकडून महापौरपदासाठीच्या हालचाली सुरू असतानाच अखेर काँग्रेसकडून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम यांचेच अर्ज राहिल्याने दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

१० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा: ७ फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी; न मिळाल्यास येथे नोंदवता येणार तक्रार.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा