सांगली : सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या राजकीय हालचाली सुरु आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमतासाठी भाजपाला केवळ एका जागेची कमतरता असल्याने सत्ता स्थापनेसाठी विविध पर्यायांचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातील काही नगरसेवकांशी प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजीत कोळी यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, निवडणूक जिंकल्यानंतर ते सध्या सांगलीवाडी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असून, सत्तेत असो वा नसो, लोकांसाठीच काम केले जाईल. महापालिकेत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, याचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने 39 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून एका नगरसेवकाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच सध्या सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून विविध पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










