‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये कराटे प्रशिक्षण; 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
‘सांगली पॅटर्न – कन्या सबळीकरण अभियान’ अंतर्गत शाळांमध्ये सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षणाची पाहणी करताना जिल्हाधिकारी अशोक काकडे. | फोटो : Sangli Today

सांगली : जिल्ह्यातील शालेय मुलींमध्ये आत्मसंरक्षणाची सवय आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या ‘सांगली पॅटर्न – कन्या सबळीकरण अभियान’ अंतर्गत कराटे प्रशिक्षण कार्यक्रम सध्या प्रभावीपणे सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 50 माध्यमिक शाळांमधील सुमारे 38 हजार विद्यार्थिनींना कराटेचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात आहे.

या प्रशिक्षण उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शुक्रवारी सांगली येथील कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेस भेट दिली. यावेळी शाळेच्या मैदानावर सुरू असलेला कराटे सराव, विद्यार्थिनींचा सहभाग आणि प्रशिक्षणाची अंमलबजावणी यांचा त्यांनी आढावा घेतला.

सरावादरम्यान पंचेस, किक्स आणि स्वसंरक्षण तंत्रांचा सराव करत असलेल्या विद्यार्थिनींमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये केवळ शारीरिक सक्षमताच नाही तर मानसिक निर्भयता देखील वाढत असल्याचे शिक्षक व प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले.

शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनी पूर्वी शाळेत येताना संकोच किंवा भीती अनुभवत होत्या; मात्र कराटे प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर त्या अधिक आत्मविश्वासाने वावरू लागल्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन वर्तनातही सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून येत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमिक शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट महिन्यापासून हा उपक्रम सुरू असून, प्रशिक्षित कराटे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव घेतला जात आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून समन्वय ठेवण्यात येत आहे.

या पाहणीवेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी गिता शेंडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका उमा संभूस, उपमुख्याध्यापक सुभाष सावंत, पर्यवेक्षक दिलीप संकपाळ, कराटे प्रशिक्षक सचिन ढोले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

हेही वाचा: सांगलीत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा