Sangli Crime News | पलूस : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जबरदस्ती विवाह आणि जातीवाचक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीत संशयितांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिचा जबरदस्ती विवाह लावण्यात आला आणि त्यानंतर वारंवार शारीरिक शोषण करण्यात आले. याशिवाय पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचेही नमूद आहे.
या प्रकरणात राजू सुरेश लोहार, माधुरी सुरेश लोहार, गणेश सुरेश लोहार (सर्व रा. किर्लोस्करवाडी, ता. पलूस) आणि शैला (रा. निढळ, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: मिरजेत तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रकृती चिंताजनक.