सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे सांगून सांगलीतील एका महिलेला तब्बल १४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता विनोद चव्हाण (रा. भार्गव रेसिडेन्सी, वखार भाग, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी एस. एस. मार्क ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली गुंतवणुकीचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी सुरुवातीला दहा लाख रुपयांचा चेक आणि चार लाख रुपये रोख दिले. त्यानंतर कंपनीने पहिल्या चार महिन्यांत दरमहा वीस हजार रुपये परतावा दिला. मात्र त्यानंतर परतावा थांबला.
सध्या चव्हाण यांची तब्बल १३ लाख २० हजार रुपयांची रक्कम बाकी असून, ती परत न मिळाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून सचिन सिद्धनाथ रोकडे (रा. सांगलीवाडी), मिलिंद बाळासाहेब गाडवे (रा. रतनशीनगर), अविनाश बाळासाहेब पाटील (रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि हिरगोंडा बाबगोंडा पाटील (रा. मालगाव) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवन्यात आला आहे.
शहर पोलिसांनी तपास सुरू केला असून, या फसवणुकीत आणखी कोणी बळी पडले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
हेही वाचा : सांगली जिल्ह्यातील २५ टक्के तर राज्यभरातील दीड कोटी लाडक्या बहिणी अपात्र? व्हायरल मेसेजमागच सत्य काय.