Sangli Crime News | सांगली : विटा परिसरात सक्रिय असलेल्या दोन टोळ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुजित काळे आणि प्रथमेश शिंदे या टोळ्यांना सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
कारवाईत सुजित काळे टोळीतील सुजित ऊर्फ आनंदा तुकाराम काळे (वय 26) आणि अक्षय उत्तम मोहिते (वय 23) तर शिंदे टोळीतील प्रथमेश ऊर्फ पिल्या मुकुंद शिंदे (वय 19) आणि स्वप्निल दगडू खिलारे (वय 22) यांचा समावेश आहे. या सर्वांवर गेल्या काही वर्षांत दरोडे, घरफोड्या, मारामाऱ्या, घातक शस्त्र बाळगणे आणि अॅट्रॉसिटीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नवरात्रोत्सव तसेच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. विटा पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावावर सुनावणी घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा: सांगलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शेतपिकांचे मोठे नुकसान.