महिला दिनानिमित्त सांगलीत ‘नारीशक्ती संवाद’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून केला सन्मान

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
महिला दिनानिमित्त सांगलीत आयोजित ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमात विद्यार्थिनींचे औक्षण करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सन्मान केला. (छायाचित्र: माहिती कार्यालय)

सांगली : जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीत आयोजित ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला.

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन, सांगली आणि शासकीय तंत्रनिकेतन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलींनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींसाठी शिक्षण शुल्क माफीसह विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

हेही वाचा: ईश्वरपूरमध्ये निर्जन ठिकाणी ‘ओपन बार’; सात जणांवर पोलिसांची कारवाई.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा