Sangli Zp Ps Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्यारे व दारुगोळा बाळगण्यास मनाई

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी महत्त्वाचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार १४ जानेवारी २०२६ रोजी 00.01 वाजल्यापासून ते १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची हत्यारे किंवा दारुगोळा बाळगून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, या उद्देशाने हा आदेश लागू करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून हा प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आला आहे.

दरम्यान, कायदेशीर कर्तव्य बजावत असलेले शासकीय कर्मचारी या आदेशातून वगळण्यात आले असून, इतर सर्व नागरिकांवर हा आदेश लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा