Sangli Today | विटा : विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली असून, तब्बल 45 वर्षांपासून सत्तेत असलेला पाटील गट सत्तेबाहेर गेला आहे. आमदार सुहास बाबर आणि शिवसेना नेते अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गटा) ने नगराध्यक्षपदासह २२ जागांवर दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेत सत्ता मिळवली आहे.
या निवडणुकीत भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे विट्यातील पारंपरिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पारंपरिक बाबर–पाटील संघर्षाला नवे वळण
विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदाही बाबर आणि पाटील गटांमध्ये थेट लढत झाली. मात्र यावेळी ही लढत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप अशी पक्षीय पातळीवर रंगली. नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण होते. शिवसेनेच्या काजल संजय म्हेत्रे आणि भाजपच्या प्रतिभा अविनाश चोथे यांच्यात थेट मुकाबला झाला.
मतमोजणीत पहिल्यापासून शिवसेनेची आघाडी
रविवारी सकाळी बळवंत महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये मतमोजणी पार पडली. पहिल्याच फेरीपासून काजल म्हेत्रे यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत ६३४ मतांची आघाडी मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत हे मताधिक्य आणखी वाढले. चार फेऱ्यांअखेर काजल म्हेत्रे यांनी ३,१९४ मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम निकाल काय सांगतो?
नगरसेवकांच्या २६ जागांपैकी:
शिवसेना (शिंदे गट): २२ जागा + नगराध्यक्ष
भाजप: ४ जागा
या निकालामुळे विटा नगरपरिषदेत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
निकालानंतर जल्लोष
निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष केला. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या विजय-पराभवामुळे विट्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
जवळपास पाच दशकांपासून पाटील गटाकडे असलेली सत्ता गमावल्याने विट्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. आगामी काळात नगरपरिषद कारभारात शिवसेना (शिंदे गट) कशी भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा; पहिल्याच निवडणुकीत यु. टी. जाधव नगराध्यक्ष.
- शिराळ्यातील बेलदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी










