सांगली : विटा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका संशयिताने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकाश चव्हाण (वय ४०) असे त्या आरोपीचे नाव असून, या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या प्रकरणी प्रकाश चव्हाण याला विटा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ठाण्यात चौकशी सुरू असताना त्याने अचानक पोलिसांची नजर चुकवली आणि एका खोलीत शिरून विद्युत उपकरणाला जोडलेली वायर गळ्याला आवळली. हा प्रकार क्षणार्धात घडल्याने सुरुवातीला पोलिसांना याचा अंदाज आला नाही.
काही क्षणांनंतर पोलिसांच्या निदर्शनास घटना आली तातडीने चव्हाणला खाली सोडवण्यात आले. त्यानंतर त्याला विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याची प्रकृती चिंताजनक असून, सध्या त्याच्यावर सतत देखरेख ठेवत उपचार सुरू आहेत.
या प्रसंगानंतर ताब्यातील आरोपींवर लक्ष ठेवण्याबाबत पोलिसांची कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाययोजना यांवर शंका उपस्थित होत आहेत. चौकशीदरम्यान आलेल्या मानसिक तणावामुळे आरोपीने असे टोकाचे पाऊल उचलले का, याची चौकशी सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा 👉 बसथांब्यावरून घरी निघालेल्या महिलेला एसटीची धडक; महिलेचा जागीच मृत्यू.