Walwa News : स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोची विटंबना; आमदार रोहित पाटील यांची कारवाईची मागणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
स्व. राजाराम बापू पाटील यांचे संग्रहित छायाचित्र | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : वाळवा तालुक्यातील येलूर येथे लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्व. पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर काळा रंग फासून, टाचण्या टोचण्यात आल्याचे तसेच लिंबू-केळी ठेवून तो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे आढळून आले आहे.

या प्रकारावर आमदार रोहित पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे एका दिवंगत लोकनेत्याच्या फोटोची विटंबना होणे निंदनीय व संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, घटनेमागील नेमका हेतू काय याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: पंचायत समिती नामांकन फॉर्मसाठी २०० रुपयांची लाच; महसूल सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा