सांगली : शहरातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सांगली पोलिसांच्या वतीने वाळवा तालुक्यातील पेठ नाका परिसरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.१५ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात वाहतूक शाखा ईश्वरपूर, महामार्ग पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच अदानी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम राबवण्यात आला.
या पथनाट्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रस्ता अपघातांचे भयावह परिणाम प्रभावी आणि वास्तवदर्शी पद्धतीने सादर केले. त्यांच्या सादरीकरणातून अपघातांमुळे होणारे मानवी, सामाजिक आणि आर्थिक नुकसान ठळकपणे मांडण्यात आले.
पथनाट्यात हेल्मेट व सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व, वेगमर्यादा पाळण्याची गरज, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, याबाबत ठोस आणि परिणामकारक संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला नागरिक, वाहनचालक तसेच कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उपक्रमाचे स्वागत केले. अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांमुळे रस्ता सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास सांगली पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोची विटंबना; आमदार रोहित पाटील यांची कारवाईची मागणी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










