सांगली : जानेवारीच्या अखेरीस नागरिकांना बँकिंग व्यवहारांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी बँक संप जाहीर करण्यात आल्याने, प्रजासत्ताक दिनासह सलग चार दिवस बहुतांश बँका बंद राहण्याची शक्यता आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला असून, सार्वजनिक, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण तसेच सहकारी बँकांमधील कर्मचारी व अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. देशभरातील सुमारे 8 लाखांहून अधिक बँक कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवार आणि रविवारची नेहमीची सुट्टी, त्यानंतर सोमवार, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची शासकीय सुट्टी, आणि मंगळवारी बँक संप — या पार्श्वभूमीवर 24 ते 27 जानेवारीदरम्यान सलग चार दिवस बँकिंग सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोख व्यवहार, धनादेश क्लीयरन्स, कर्ज व्यवहार, काऊंटर सेवा यावर परिणाम होऊ शकतो.
या संपामागे बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, तसेच सध्या सुट्टी असलेल्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारव्यतिरिक्त उर्वरित सर्व शनिवार सुट्टी जाहीर करावी, ही प्रमुख मागणी असल्याचे सांगण्यात आले आहे. इतर अनेक शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये आधीच पाच दिवसांचा आठवडा लागू असल्याने, बँक कर्मचाऱ्यांमध्ये असमानतेची भावना निर्माण झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संपामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत आधीच आवश्यक आर्थिक व्यवहार पूर्ण करून ठेवावेत, तसेच डिजिटल बँकिंग पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन बँकिंग क्षेत्रातील सूत्रांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा: स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोची विटंबना; आमदार रोहित पाटील यांची कारवाईची मागणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










