Sangli Accident : अंकलीजवळ दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Ankali Bike Accident

सांगली (प्रतिनिधी): मिरज तालुक्यातील अंकली परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत महिलेचे नाव शेवंता वसंत कज्जे (वय 65, रा. लक्ष्मीनगर, मिरज) असे असून, त्यांचे पती वसंत कज्जे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दांपत्य निमशिरगाव येथून मिरजेकडे दुचाकीवरून परतत असताना अंकलीजवळ त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला. दुचाकी घसरून दोघे रस्त्यावर पडले.

दरम्यान, मागून येणाऱ्या ट्रकच चाक शेवंता कज्जे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वसंत कज्जे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या अपघाताबाबत अशोक वसंत कज्जे यांनी ट्रकचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा