Miraj Fraud: मिरजेत बेदाणा व्यापाऱ्याला गंडा; 75 लाखांची फसवणूक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Miraj Fraud (प्रातिनिधिक छायाचित्र)

मिरज : मिरजेत बेदाण्याच्या व्यापारात मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाटणा (बिहार) येथील व्यापाऱ्याने बेदाणा खरेदी करून त्याची रक्कम न देता मिरजमधील व्यापाऱ्याला तब्बल 75 लाख 28 हजार 377 रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी केयूर गिरीशकुमार शहा यांनी तक्रार दाखल केली आहे. केयूर शहा हे मिरजेत ‘जी. एस. शहा अ‍ॅण्ड कंपनी’ या नावाने बेदाण्याचा व्यवसाय करतात, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ‘दृष्टी अ‍ॅग्रोटेक फर्म’ कार्यरत आहे. तक्रारीनुसार, पाटणा येथील व्यापारी मनोजकुमार यादव हा शहा यांच्या संपर्कात होता.

मनोजकुमार यादव याने 10 जानेवारी 2023 रोजी जी. एस. शहा अ‍ॅण्ड कंपनीकडून सुमारे 15 लाख 28 हजार रुपयांचा, तसेच दृष्टी अ‍ॅग्रोटेक फर्मकडून 59 लाख 99 हजार रुपयांचा बेदाणा खरेदी केला होता. मात्र, माल स्वीकारल्यानंतरही संबंधित व्यापाऱ्याने कोणतीही रक्कम अदा केली नाही.

रक्कम मिळण्यासाठी केयूर शहा यांनी वारंवार संपर्क साधून पाठपुरावा केला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: कुपवाड एमआयडीसीत कारखान्यात मोठी चोरी; सात लाखांचे ॲल्युमिनियम पॅटर्न लंपास.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा