मिरज : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तयारीला वेग आला असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार, दि. 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या मुलाखती समित (दादा) यांच्या निवासस्थानी सायंकाळी 4 वाजल्यापासून घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली.
मिरज येथे नुकत्याच झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला निवडणूक निरीक्षक तथा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने, माजी सभापती महादेव कुरणे, माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सांगितले की, आगामी निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपसोबतच निवडणूक लढवणार आहे. सध्या पक्षात मोठ्या प्रमाणावर नवीन कार्यकर्ते आणि इच्छुकांचा सहभाग वाढत असून संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षाकडून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाच्या निवडणूक रणनीतीचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










