सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. आज सांगली शहरातील महापालिका क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.
या मुलाखतींमध्ये उमेदवारांचा सामाजिक कार्याचा अनुभव, संघटनात्मक कामगिरी, प्रभागातील प्रश्नांची जाण आणि शहराच्या विकासाबाबतची दृष्टी यावर थेट संवाद साधण्यात आला. भाजपकडून सक्षम, लोकसंपर्क असलेले आणि निवडणूक लढवण्याची ताकद असलेले उमेदवार निवडण्यावर भर दिला जात आहे.
मुलाखतींसाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे तसेच सांगली शहर निवडणूक प्रभारी शेखर इनामदार उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या एकूण 78 जागांसाठी तब्बल 570 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रभागनिहाय मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे उमेदवार निवडीचे आव्हान भाजप नेतृत्वासमोर उभे राहिले आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढील दोन दिवस चालणार असून, त्यानंतर सर्व बाबींचा आढावा घेऊन अंतिम उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. आगामी निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा: जनसुराज्य शक्ती पक्षाच्या तयारीला वेग; उमेदवारांच्या मुलाखती 14 डिसेंबरपासून.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










