नागपूर : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल आता लवकरच वाजण्याची शक्यता असून प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. नागपूर येथे सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या आठवड्यात संपणार असून, त्यानंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध धोरणात्मक निर्णयांसह निवडणुकीसंदर्भातील बाबींवरही चर्चा होण्याची शक्यता असून, बैठकीनंतरच सायंकाळी किंवा त्यानंतरच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो.
राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक नियोजन पूर्ण केले असून, 12 ते 15 जानेवारीदरम्यान महापालिकांसाठी मतदान घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सज्ज करण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेच्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची हालचाल अधिक तीव्र होणार आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
हेही वाचा: भाजपची इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण; महापालिका निवडणुकीची तयारी निर्णायक टप्प्यात.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; २८ ऑक्टोबरनंतर भाव आणखी कोसळणार की तेजी येणार? खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे दर (२५ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Maharashtra Weather: राज्यात धो-धो पाऊस? २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हवामानात मोठा उलटफेर; उकाड्यात पावसाची चाहूल









