Sangli News : काळ्या खणीत आढळला सांगलीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli News | प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली : संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिराज इब्राहिम मुल्ला (वय २१, रा. राम रहिम कॉलनी) हा युवक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळ्या खणीतील पाण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शिराज मुल्ला हा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची नोंद त्याच्या नातेवाइकांनी संजयनगर पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान, काळी खण परिसरात पाण्यात मृतदेह असल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान हा मृतदेह शिराज मुल्ला याचा असल्याची ओळख पटली.

काळ्या खणितील पाण्याच्या साठ्याबाबत यापूर्वीही सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले होते. दुर्गंधी, अस्वच्छता आणि अपघाताचा धोका याबाबत आंदोलनही करण्यात आले होते. याच ठिकाणी युवकाचा मृतदेह सापडल्याने काळ्या खाणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मृतदेह अत्यंत अडचणीच्या ठिकाणी पाण्यात असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपदा मित्र आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तीव्र दुर्गंधी आणि खोल पाणी असल्यामुळे अडथळे येत असतानाही जवानांनी प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.

रेस्क्यू पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

हेही वाचा: देवराष्ट्रेत युवकावर बिबट्याचा हल्ला; कुत्र्यांच्या प्रतिकारामुळे जीव वाचला, पिल्लांसह बिबट्याचे झाडात पलायन.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा