Sangli News | सांगली : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या धनगर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू असून, या संघर्षात काही धनगर बांधवांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू पावलेले व्यक्ती बहुतांश कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत असल्याने त्यांच्या निधनामुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविका, शिक्षण आणि भविष्यातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच प्रत्येक पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.
या वेळी आमदार बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते. धनगर समाजाच्या न्यायहक्कांसाठी सुरू असलेला लढा ठामपणे आणि सातत्याने सुरू राहील, असेही आमदार पडळकर यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर.
- शिराळ्यातील बेलदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी










