सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण 574 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मात्र, पहिल्या दिवशी कोणताही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 9, 10 आणि 11 येथील कार्यालयांमध्ये सर्वाधिक 142 अर्जांची विक्री झाली असून, त्याखालोखाल प्रभाग 1, 2 आणि 8 येथे 111 अर्ज विकले गेले आहेत. इतर प्रभागांमध्येही समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
उमेदवारांसाठी स्वतंत्र कक्ष, आवश्यक माहिती व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमांनुसार राबवली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेळापत्रकानुसार नामनिर्देशन अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: फायनान्स एजंट असल्याचा बनाव करून वाहनधारकांकडून जबरी वसूली; मिरजमध्ये दोन तासांत चौघांना अटक.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










