दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या तारखेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक: सांगली जिल्हा परिषदेचे आवाहन

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
फोटो : सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

सांगली : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण, विकास आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या नागरी समाज संघटना व संस्थांची नोंदणी अनिवार्य असून, ज्या पात्र संस्थांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत कलम 49 ते 53 नुसार दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संस्था व संघटनांची नोंदणी आवश्यक आहे. तथापि, सध्या जिल्ह्यात काही संस्था वैध नोंदणीशिवाय कार्यरत असल्याचे निदर्शनास आले असून, ही बाब अधिनियमातील कलम 50 चे उल्लंघन करणारी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या नोंदणी प्रक्रियेचा उद्देश दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांच्या कामकाजात एकसमानता राखणे, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे तसेच सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी संघटना व संस्थांसाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

पात्रतेचे निकष

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण, विकास व पुनर्वसन क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत असलेली संस्था असणे आवश्यक आहे. संबंधित संस्था सोसायटी नोंदणी कायदा 1866, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 किंवा कंपनी कायदा 2013 (कलम 8) अंतर्गत नोंदणीकृत असावी. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016, केंद्र शासनाचे दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2017 आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियमांनुसार पात्र असणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

नोंदणीसाठी अर्ज करताना संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी शुल्क भरल्याची पावती, वार्षिक अहवाल, मागील तीन वर्षांचे सनदी लेखापरीक्षण अहवाल तसेच वास्तूविषयक माहिती सादर करणे आवश्यक आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून स्वतःचे वित्तीय स्रोत असणे अपेक्षित आहे.

संबंधित संस्थांनी आपले अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, सांगली येथे 31 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीत महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भित्तिपत्रके आढळली; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा