महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद; तीन दिवसांत हजारो अर्जांची विक्री

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
फोटो : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका (Sangli Today)

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज विक्रीला इच्छुक उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून अवघ्या तीन दिवसांत एकूण 1,667 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.

तिसऱ्या दिवशी एकाच दिवसात 521 अर्जांची विक्री नोंदविण्यात आली आहे. तसेच, 8 उमेदवारांनी प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 1 मधून 2, कार्यालय क्रमांक 5 मधून 5 आणि कार्यालय क्रमांक 6 मधून 1 अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अर्ज विक्रीच्या आकडेवारीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 4 क्षेत्रात सर्वाधिक 300 अर्जांची विक्री झाली असून, इतर प्रभागांमध्येही इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीबाबत सर्वच प्रभागांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या तारखेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक: सांगली जिल्हा परिषदेचे आवाहन.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा