सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी आयोजित सांगली मॅरेथॉनमध्ये ३,००० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आरोग्य आणि लोकशाही सहभाग यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमातून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या मॅरेथॉनमध्ये ३, ५, १०, २१ आणि ३५ किलोमीटर अंतरांच्या विविध शर्यती पार पडल्या. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, धावपटू तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांनी नागरिकांना संबोधित करत आरोग्याबरोबरच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “सुदृढ शरीराइतकीच सुदृढ लोकशाही महत्त्वाची असून प्रत्येक मताचा प्रभाव शहराच्या भवितव्यावर पडतो,” असे त्यांनी नमूद केले.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी येत्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले, तर उप आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी स्मृती पाटील यांनी कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्यास मतदान करण्यास सांगावे, असे सांगितले.
मॅरेथॉनदरम्यान “मी पण मतदान करणार – तुम्ही पण मतदान करा” या संदेशासह उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित नागरिकांणी मतदान शपथ घेतली.
हेही वाचा: रोजगारासाठी मुंबईत असलेल्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा असणार – आ. गोपीचंद पडळकर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










