मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारास सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल उर्फ शाहबाज बादशाह सुभेदार (वय २४, रा. ईदगाह नगर, मिरज) असे हद्दपार करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर घातक शस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे यासह दखलपात्र स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
या संशयितावर यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक तसेच अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याचेही स्पष्ट झाले होते.
निवडणूक कालावधीत संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी सदर आरोपीस सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










