मिरज : २७ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मिरज येथून उद्योजक ॲड. चंद्रकांत रामचंद्र ऊर्फ सी.आर. सांगलीकर यांना अटक केली आहे. बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएसीएल कंपनीशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीद्वारे गुंतवणूकदारांची व शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे.
संशयित मिरज परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मिरजेत छापा टाकून सांगलीकर यांना अटक केली व न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात इतर आरोपींची भूमिका, आर्थिक व्यवहारांचा तपशील तसेच जमीन व्यवहारांबाबतची कागदपत्रे तपासली जात असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










