वाळवा : वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द परिसरात मंगळवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या एक वर्षाच्या खिलार कालवडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या ऊस हंगाम सुरू असल्याने शेतवस्त्यांमध्ये लोकांचा वावर वाढला आहे. ऐतवडे खुर्द गावालगत चौगुले मळा, मुगदुमी, पर्वतवाडी, पवार वस्ती, बामनकी परिसरात अनेक कुटुंबे शेतवस्त्यांवर वास्तव्यास आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वारंवार दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या मागील बाजूस असलेल्या मधुकर शामराव पाटील यांच्या घराजवळील गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, याच परिसरात यापूर्वीही बिबट्याने दहा शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत.
शाळेच्या आसपास बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेही वाचा: सांगलीतील या मामांमुळे ‘तारक मेहता फेम भिडे’ ला आली ‘हमारे जमाने कि याद’; शेयर केला व्हिडिओ.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










