Leopard Attack : उपवळे येथे 9 वर्षांच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला; भावामुळे बचावली

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

शिराळा : शिराळा तालुक्यातील उपवळे गावात बुधवारी (दि. 7) रात्री बिबट्याने नऊ वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात स्वरांजली संग्राम पाटील (वय 9) ही बालिका जखमी झाली असून तिच्यावर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेवणानंतर स्वरांजली आणि तिचा भाऊ शिवम हे शेजारच्या घराकडे जात असताना हनुमान मंदिराजवळ अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने स्वरांजलीच्या मानेला पकडले. मात्र, तिच्या डोक्यावर असलेल्या टोपीमुळे गंभीर इजा टळली.

या वेळी भाऊ शिवमने धैर्य दाखवत स्वरांजलीचा पाय पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आई स्वप्नाली पाटील यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांचा आवाज आणि हालचाल वाढल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती देण्यात आली आहे.

या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा: पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही ऑनलाईन हजेरी सुरू.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा