सांगली : सांगली शहरात खासगी सावकारीच्या वसुलीसाठी घरात घुसून दमदाटी केल्याचा आणि घरातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस तक्रारीनुसार, यशवंतनगर परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिक महिलेने काही काळापूर्वी खासगी सावकाराकडून २५ लाख रुपये कर्ज घेतले होते. सदर रक्कम महिना ५ टक्के व्याजदराने देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या व्यवहाराच्या अनुषंगाने चार महिन्यांच्या व्याजासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता.
संबंधित धनादेश वटवून रक्कम काढून घेतल्यानंतरही संशयित सावकाराने पुन्हा वसुलीसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास संशयित सावकार हा आपल्या एका सहकाऱ्यासह चारचाकी वाहनातून फिर्यादी यांच्या घरासमोर आला. घराबाहेर उभे राहून शिवीगाळ करत पैसे किंवा व्याज तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी घरातील पुरुष सदस्य बाहेर गेल्याचे समजताच संशयिताने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. घरात बसून धमकी देत घर विकून पैसे देण्याचा दबाव टाकण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच दरम्यान घरातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळाची पाहणी करून संबंधित वाहन आणि अन्य बाबींची तपासणी केली जात आहे. संजयनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: सांगलीत 11 जानेवारीला भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव; कथ्थक, शास्त्रीय गायन व तालवादनाचा सुरेल संगम.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










