ZP Election 2026 : मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मतदान तारखेच्या पुनर्विचाराची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांचे निवडणूक आयोगाला निवेदन

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर करताना आमदार गोपीचंद पडळकर | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी जाहीर करण्यात आलेल्या मतदान दिनांकाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ ही मतदान तारीख निश्चित केली आहे. मात्र, याच दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी श्री मायाक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याकडे आमदार पडळकर यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मायाक्का देवी यात्रेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असून, हजारो बैलगाड्या घेऊन लाखो नागरिक या यात्रेसाठी यात्रेला जातात. अशा परिस्थितीत मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर मतदान दिनांक ५ फेब्रुवारी ऐवजी पुढील काही दिवसांवर हलविण्याचा विचार करावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेतली, तसेच निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

निवेदनानुसार, या विषयावर पुढील निर्णय घेण्यापूर्वी सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्याची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: मतमोजणीची जय्यत तयारी; ५२७ मतदान केंद्रांची मोजणी, १० फेऱ्यांत निकाल.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा