सांगली : राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यानुसार, पूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असून, मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी 2026 करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सुधारित कार्यक्रमानुसार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराची अधिकृत मुदत 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित भागातील आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हा सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्यातील 12 जिल्हा परिषदांमधील आणि त्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील मतदारांनी तसेच उमेदवारांनी बदललेल्या तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगली महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना ब्रेक.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










