सांगलीतील शाळेचे कार्यालय सील; कर थकबाकीदारांवर सांगली मनपाची जप्तीची धडक कारवाई सुरु

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी कुपवाडमधील शाळेच्या कार्यालयावर सीलिंगची कारवाई. फोटो सौजन्य : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी राबवलेली मोहीम अधिक कडक करण्यात आली असून, थकबाकीदार संस्थांवर थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून कुपवाड येथील उपाध्ये गर्ल हायस्कूलच्या प्रशासकीय कार्यालयावर आणि स्टाफ रूमवर महापालिकेने जप्तीची कारवाई करत सील ठोकले आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेकडे सुमारे ₹4.73 लाखांची मालमत्ता कर थकबाकी प्रलंबित होती. वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न झाल्याने 31 जानेवारी 2026 रोजी कुपवाड विभागातील वसुली पथकाने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन ही कारवाई केली.

सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, कर अधीक्षक मोहन कलगुडगी, वॉरंट अधिकारी अशोक कोळी आणि कुपवाडच्या वसुली पथकाने ही कारवाई केली.

महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मालमत्ता व्यावसायिक असो, निवासी असो किंवा शैक्षणिक संस्था — कर थकवल्यास जप्तीची कारवाई केली जाईल. 

दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे, त्यांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तातडीने संबंधित नागरी सुविधा केंद्रात (CFC) कर भरणा करावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : सांगली–मिरज–कुपवाडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी; आयुक्त सत्यम गांधी यांची प्रत्यक्ष पाहणी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा