सांगली : नागपूर येथील पशुखाद्य उत्पादक कंपनीची सांगलीतील व्यापाऱ्यांकडून तब्बल ८१ लाख ४६ हजार २९६ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नागपूर येथील साईबाबा नॅचरल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक संतुलाल जमताणी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सांगली येथील श्री साई फीड सांगली या नावाने व्यवहार करणारे सुरेश प्रभाकर पाटील व जया सुरेश पाटील (रा. दत्तनगर, सांगली) यांनी कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर पशुखाद्य खरेदी केले होते.
फिर्यादी व संशयित आरोपी यांची पूर्वीपासून ओळख असल्याने विश्वासावर वेळोवेळी पशुखाद्य पाठविण्यात आले. कंपनीकडून एकूण ८१ लाख ४६ हजार २९६ रुपयांचे पशुखाद्य पाठवण्यात आले. मात्र, त्यानंतर संबंधितांनी रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरू केल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संतुलाल जमताणी यांनी शेवटी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, व्यवहारासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: सांगली महापालिकेचा कर विभाग ‘डिजिटल’; कागदविरहित कामकाजाकडे वाटचाल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










