सांगली महानगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी डॉग शेल्टर आणि मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी पशू शवदाहिनी उभारण्यासाठी 5.88 कोटींच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली.
सांगली : शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि मृत जनावरांच्या विल्हेवाटेचा प्रश्न सोडवण्यासाठी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेने आखलेल्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी एकूण सुमारे 5 कोटी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार असून, निधीपैकी सुमारे 70 टक्के हिस्सा शासनाकडून तर उर्वरित 30 टक्के रक्कम महापालिकेकडून देण्यात येणार आहे.
मोकाट कुत्र्यांच्या निवारा, उपचार व देखभालीसाठी सांगलीवाडी परिसरात अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 2 कोटी 51 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित असून यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियोजनबद्ध उपाययोजना करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यासोबतच लहान व मोठ्या मृत जनावरांच्या मृतदेहांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समडोळी रोड येथील कचरा डेपो परिसरात पशू शवदाहिनी यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे 3 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नगरोत्थान महाअभियानांतर्गत महानगरपालिकेला विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, या नव्या प्रकल्पांमुळे शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनात सुधारणा होईल असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: माधवनगरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; मतदारांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










