ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाला दुसरा क्रमांक मिळाला. | छायाचित्र संकलन : Sangli Today

सांगली : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यांकनात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डिजिटल सेवा सक्षमपणे राबवल्याबद्दल हा सन्मान मिळाला.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात कार्यालयाची वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, प्रशासकीय डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेनचा वापर तसेच GIS आधारित कामकाज अशा सात निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. २६ जानेवारी २०२६ रोजी या निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड जाहीर करण्यात आली होती.

निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवण्यात आलेल्या जिल्हा परिषद संवर्गाचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, या मूल्यांकनात पुणे जिल्हा परिषद प्रथम, सांगली दुसऱ्या क्रमांकावर तर ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदा अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या कार्यसंघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून, लवकरच सर्व विजेत्यांचा राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: सांगलीत राष्ट्रवादी (शरद पवार) सर्वात मोठा पक्ष; भाजप दुसऱ्या क्रमांकावर.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा