सांगली : जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आणि 51 टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्य असलेल्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सन 2025-26 या वर्षासाठी अनुदान दिले जाणार आहे.
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. अर्ज जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी केले आहे.
कोण पात्र?
संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी
विश्वस्त/सदस्यांपैकी किमान 51% बौद्ध समाजातील असावेत
यापूर्वी अनुदान घेतले असल्यास उपयोगिता प्रमाणपत्र आवश्यक
प्रस्तावातील कामासाठी अनुदानाचा योग्य वापर करणे बंधनकारक
कोणत्या कामांसाठी अनुदान?
इमारत बांधकाम / दुरुस्ती
वर्गखोल्या सुधारणा
आवश्यक साहित्य खरेदी
पायाभूत सुविधा उभारणी
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
पूर्ण भरलेला अर्ज (प्रपत्र-1)
स्वयंघोषणापत्र (प्रपत्र-2)
विश्वस्त/सदस्य यादी
नोंदणी प्रमाणपत्र
मागील अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र
अंदाजपत्रक व आराखडे (लागू असल्यास)
मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल
कागदपत्रे अपूर्ण असल्यास छाननीनंतर दोन आठवड्यांची मुदत दिली जाईल; त्यानंतर प्रस्ताव अपात्र ठरू शकतो.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली
संपर्क: 0233-2600525
हेही वाचा: रुग्णवाहिकेला अडथळा तर 10 हजारांचा दंड; सांगलीत वाहनधारकावर कारवाई.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










