सांगली : सांगली जिल्हा पोलिस भरती 2024-25 अंतर्गत पोलिस शिपाई पदासाठी झालेल्या कागदपत्र पडताळणी, शारीरिक व मैदानी चाचण्यांचे गुणपत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. गुणांबाबत आक्षेप असलेल्या उमेदवारांसाठी हरकत नोंदवण्याची अंतिम मुदत 16 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून, आता केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
सदर गुणपत्रक sanglipolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक, सांगली कार्यालयाबाहेर आणि पोलिस मुख्यालयातील कवायत मैदान येथेही यादी लावण्यात आली आहे.
उमेदवारांना दर्शविण्यात आलेल्या गुणांबाबत हरकत असल्यास ती 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकेतस्थळावरील नमूद प्रक्रियेनुसार, sp.sangli@mahapolice.gov.in या ई-मेलवर, नियंत्रण कक्षाच्या 9730928958 या WhatsApp क्रमांकावर, 0233-2672100 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष लेखी स्वरूपात अर्ज सादर करता येणार आहे.
निर्धारित वेळेनंतर कोणत्याही हरकती स्वीकारल्या जाणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गुणांकाबाबत हरकत असल्यास संबंधित उमेदवारांनी मुदत लक्षात घेऊन तातडीने हरकत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: 40 शासकीय योजनांचे स्टॉल ते मोफत कायदेशीर मदत; विट्यात विधी सेवा महामेळाव्याला नागरिकांची गर्दी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










