सांगलीत धाडसी चेन स्नॅचिंग; बेल वाजवून दरवाजा उघडताच महिलेच्या गळ्यातील 65 हजारांची चेन लंपास

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगलीत बेल वाजवून दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर झडप; 65 हजारांची सोन्याची चेन हिसकावून चोरटा फरार. | प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी धाडसी चेन स्नॅचिंगची घटना घडली. गुलमोहर कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटची बेल वाजवून दरवाजा उघडताच 59 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून चोरट्याने पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निशा विजयकुमार शहा (वय 59, रा. मनीषा अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कशी घडली घटना?

शुक्रवारी सायंकाळी शहा यांच्या फ्लॅटची बेल वाजली. बाहेर अंदाजे पाच फूट उंचीचा अनोळखी व्यक्ती उभा होता. “काय पाहिजे?” असे विचारण्यासाठी त्या दार उघडून बाहेर आल्या, चोरट्याने क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील साडेबारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून घटनास्थळावरून पलायन केले.

महिलेने आरडाओरडा केला; मात्र तोपर्यंत चोरटा पळून गेला होता.

पोलिसांचा तपास सुरू

विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

नागरिकांसाठी इशारा

अलीकडे फ्लॅटची बेल वाजवून किंवा कुरिअरच्या नावाखाली फसवणूक आणि चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी दरवाजा उघडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन विश्रामबाग पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: सोने दुप्पट करून देतो म्हणत 60 वर्षीय वृद्धाची सव्वातीन लाखांची फसवणूक; कडेपूरमध्ये भोंदू बाबाचा डाव.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा