सांगली : बुधवारी सकाळी सांगलीतील 24 वर्षीय युवकाचा मृतदेह इचलकरंजी येथील शाहापूर परिसरातील मोकळ्या जागेत आढळून आला. चेहरा मोठ्या दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आल्याने सुरुवातीला ओळख पटविण्यास पोलिसांना अडचण आली.
मृताची ओळख शाहबाज शब्बीर शेख (वय 24) अशी असून त्याचे नातेवाईक इचलकरंजीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इचलकरंजी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कपड्याच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याचा संशय आहे. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला असावा.
फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत धाडसी चेन स्नॅचिंग; बेल वाजवून दरवाजा उघडताच महिलेच्या गळ्यातील 65 हजारांची चेन लंपास.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









