सांगली : पुणे–बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी कंटेनर उलटल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र वाहनांची लांबच लांब रांग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या दुभाजकावर आदळला. धडकेनंतर मागील चाके निखळून वाहन रस्त्याच्या मध्यभागी आडवे झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
सध्या या परिसरात रस्त्याचे काम सुरू असून, वाहतूक सेवा मार्गावरून वळवण्यात येत आहे. इतकरे फाटा ते येलूर फाटा दरम्यान घसर आणि वळण असल्याने अवजड वाहनांना अडचण होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. या ठिकाणी वारंवार किरकोळ अपघात होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
अपघातानंतर काही युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या काही शिक्षकांना कोंडीचा फटका बसला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
हेही वाचा: सांगलीत 39,628 विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा सुरू; 40 भरारी पथके, डिजिटल वॉच.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










