तासगाव : मुदत खरेदी दस्तांची नोंद करून सात-बारा देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरगाव (विसापूर) येथील संजय शंकर पवार (वय 56) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तक्रारदार यांच्या वडिलांनी गहाण स्वरूपात दिलेल्या जमिनीचा दस्त तक्रारदार व त्यांच्या बहिणीच्या नावावर करण्यात आला होता. त्या दस्ताची तलाठी कार्यालयात नोंद करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या दस्तांची तलाठी कार्यालयात नोंद करण्यासाठी अर्ज दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने नोंद व सात-बारा देण्यासाठी स्वतःसह तलाठ्यांसाठी एकूण 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 10 हजार रुपये स्वीकारताना संशयिताला रंगेहात पकडण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
हेही वाचा: शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांसाठी ‘आरोग्य कवच’; सांगली मनपात मोफत तपासणी शिबिर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










