मिरज : विद्यानगर, माजी सैनिक वसाहत परिसर आणि कुपवाड वॉर्ड क्रमांक २ मधील ड्रेनेज व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर गजानन मगदूम यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
विस्तारित भागात ड्रेनेज लाईन समस्या, सांडपाणी साचणे आणि अनियमित पाणीपुरवठा याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत उपमहापौर मगदूम यांनी स्थळपाहणीदरम्यान तांत्रिक अडचणींचा आढावा घेतला व ड्रेनेजचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, माजी सैनिक स्तंभ ते मिरज गव्हर्नमेंट क्वार्टर्स (सावळी रोड) या दरम्यान सुरू असलेल्या रस्ते विकासकामाचीही पाहणी करण्यात आली. रस्त्यावरील चेंबर उंचीकरण आणि रस्त्याची पातळी यामध्ये तांत्रिक अचूकता राखण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले.
काही काळापासून या भागाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली होती. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या ऐकून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
“मिरज आणि कुपवाडचा विस्तारित भाग वेगाने वाढत आहे. येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे ही आमची जबाबदारी आहे. ड्रेनेज व रस्त्याची कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे उपमहापौर गजानन मगदूम यांनी सांगितले.
उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्वच्छतेबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन नियमित साफसफाईचे आदेश आरोग्य विभागाला दिले.
हेही वाचा: सांगलीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात; अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










