सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्र, शेरी नाला जॅकवेल उपसा केंद्र आणि अमरधाम स्मशानभूमीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
आयुक्त गांधी यांनी माळ बंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला. नागरिकांना मिळणारे पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य असावे यासाठी दररोजचे प्रयोगशाळा अहवाल अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच क्लोरीनचे प्रमाण आणि गाळ उपसा प्रक्रियेचे नियोजन काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले.
यानंतर आयुक्तांनी शहरातील सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या शेरी नाला जॅकवेल उपसा केंद्राची पाहणी केली. नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी त्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करावी तसेच पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, अमरधाम स्मशानभूमीतील गॅस दाहिनी गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. यावेळी आयुक्तांनी तातडीने नवीन मशीन बसवून ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा: वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










