वाळवा : तालुक्यातील ईश्वरपूर येथील पेठ-ईश्वरपूर रोडवरील मिडलॅण्ड हॉटेलजवळ उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यल्लामा चौक, बुरूड गल्ली येथील किशोर कुमार साळुंखे (वय 36) यांचे पेठ ते ईश्वरपूर रोडवरील कापूरवाडी येथे बांबू साहित्याचे दुकान आहे.
दि. 9 मार्च रोजी सकाळी सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास ते मित्राच्या कामासाठी मिडलॅण्ड हॉटेलजवळ गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली सुझुकी Access 125 ही दुचाकी स्वामी समर्थ ऑईल दुकानासमोर हँडल लॉक करून उभी केली होती.
सुमारे अर्ध्या तासानंतर ते परत आले असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून दुचाकी चोरी केल्याची तक्रार देण्यात आली.
सुमारे 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून 59 लाखांची फसवणूक; सेवानिवृत्त शिक्षकाला गंडा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










