मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगलीला निघाले… शिरढोण येथे दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगलीला येत असताना शिरढोण येथे दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू. File Photo

कवठेमहांकाळ : मुलगी रिद्धीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह सांगलीला येत असताना दुचाकी अपघातात महेश शारदा शिंदे (रा. दसरा चौक, शिवाजी नगर, सांगली) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरढोण येथे घडली.

महेश शिंदे हे पत्नी जयम्माबाई आणि मुलगी रिद्धी यांच्यासह आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रेड्डीपल्ले येथे राहत होते. चालक म्हणून काम करत तसेच शेतीची कामे करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मुलगी रिद्धीचा तसेच स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते कुटुंबासह सांगलीला येत होते.

9 मार्च रोजी रात्री ते बसव्वा एक्सप्रेस रेल्वेने अनंतपूरहून सोलापूर येथे आले. त्यांनी त्यांच्यासोबत बजाज पल्सर दुचाकी रेल्वेच्या पार्सल डब्यातून आणली होती. सोलापूर येथे उतरल्यावर बॅगा जास्त असल्याने पत्नी आणि मुलीला एसटी बसने सांगलीला पाठवून महेश शिंदे हे दुचाकीवरून सांगलीकडे निघाले.

दरम्यान, 10 मार्च रोजी दुपारी शिरढोण येथील जेजे हॉटेल समोर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीची रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: शिराळ्यात मक्याच्या शेतात गांजाची लागवड; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा