मिरज : उसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना मिरजमध्ये घडली असून याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 मार्च रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास भिमनगर, म्हैशाळ वेस मिरज परिसरात ही घटना घडली. मैफुज झाकीर मुल्ला (वय 22) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या भावजयने काही महिन्यांपूर्वी यासीन जमादार याच्याकडून 70 हजार रुपये उसने घेतले होते.
हे पैसे परत करण्याबाबत चर्चा करण्यासाठी तो यासीन जमादार यांच्या घरी गेला असता, पैशांवरून वाद झाला. यावेळी यासीन जमादार याने घरातून कोयता आणून त्याच्या डोक्यात मारला, तर त्याची पत्नी आसमा जमादार हिनेही मारहाण केली.
या हल्ल्यात मैफुज मुल्ला जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी यासीन जमादार व आसमा जमादार या दोघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत रमजान ईद उत्साहात; ईदगाहवर नमाज, हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










