Sangli Irrigation Update: सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आजपासून ‘म्हैसाळ’ आणि ‘ताकारी’ योजनांचे आवर्तन सुरू, दुष्काळी भागासाठी २८ टीएमसी पाण्याचे नियोजन

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
म्हैसाळ आणि ताकारी उपसा सिंचन योजनांचे रब्बी आवर्तन आजपासून सुरू; दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): जिल्ह्याच्या पूर्व भागातील तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने आज—रविवार, दि. १५ नोव्हेंबरपासून ‘म्हैसाळ’ आणि ‘ताकारी’ या दोन्ही प्रमुख उपसा सिंचन योजनांचे रब्बी हंगामातील आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी रब्बी हंगामाचे आवर्तन साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात सुरू केले जाते; मात्र यंदा जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेली तीव्र टंचाई लक्षात घेता तीन महिने आधीच दोन्ही योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यंदा पूर्व भागातील बहुतांश पाझर तलाव आणि बंधारे कोरडे पडल्याने उभी पिके करपू लागली होती, तर अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आता दोन्ही योजना सुरू झाल्याने कोरडे तलाव भरून घेण्यास आणि रब्बी पिकांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा: लाडक्या बहिणींचे १,५०० रुपये नेमके कुठे खर्च होतात? राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर; बचत वाढली पण उत्पन्नाचे साधन मात्र नगण्य.

कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचे नियोजन 

नुकत्याच पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी कोयना धरणातून एकूण २८ टीएमसी (TMC) पाणी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कोयना धरणातून सध्या १,०५० क्युसेक विसर्ग अखंड सुरू ठेवण्यात आल्यामुळे कृष्णा नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला असून, या पाण्यावर ताकारी आणि म्हैसाळ योजनांचे पंप कार्यान्वित करण्यात येत आहेत. याशिवाय म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी वारणा धरणातून ९५० क्युसेक विसर्ग सोडण्याची मागणीही पाटबंधारे विभागाने धरण व्यवस्थापनाकडे केली आहे.

पहिल्या १५ दिवसांत जत तालुक्याला प्राधान्य 

या आवर्तनाच्या पहिल्या टप्प्यात पुढील सुमारे १५ दिवस दुष्काळी झळ सर्वाधिक असलेल्या जत तालुक्यातील गावांना प्राधान्याने पाणी दिले जाणार आहे. जतच्या पूर्व भागातील तलाव भरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. जत तालुक्यातील पाणीसाठा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर-आटपाडी या टंचाईग्रस्त तालुक्यांतील लाभक्षेत्राला सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: ७/१२ उतारा, फेरफार, Index II ते वारस नोंद; जमिनीची १४ महत्त्वाची कागदपत्रे घरबसल्या कशी काढायची? जाणून घ्या अधिकृत वेबसाईट्स.

📢 महाराष्ट्रातील नवीन सरकारी योजना, शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा