सांगली : मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर झाली असून मोठ्या प्रमाणावर शेती, घरे, जनावरे आणि शेतीसाहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत केवळ आश्वासनांवर न थांबता पूरग्रस्तांना प्रत्यक्ष आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम भूमिका मांडली.
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना सर्वंकष मदत मिळाली नाही तर काँग्रेसला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आ. विश्वजित कदम म्हणाले की, “शेतकऱ्यांची दिवाळी सुकर व्हावी यासाठी सरकारने तात्काळ कर्जमाफी जाहीर करणे गरजेचे आहे. शेतकरी मोठ्या संकटात असल्याने शासनाने तत्परतेने निर्णय घ्यावा.”
हेही वाचा: निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल.